Ad will apear here
Next
नवी ऑडी ‘ए४ ३५ टीएफएस आय’ दाखल
पुणे : नवीन ‘ऑडी ए४ ३५ टीएफएस आय’ ही कार नुकतीच येथे दाखल करण्यात आली. देशात आणि जागतिक पातळीवरही लोकप्रिय असलेल्या या मॉडेलमध्ये अनेक नाविन्यपूर्ण सुविधांचा समावेश करण्यात आला आहे. यामुळे या श्रेणीत ही कार नवीन मापदंड स्थापन करेल, असा कंपनीला विश्वास आहे.

कार्यक्षमता, आरामदायी ड्रायव्हिंग अनुभव आणि उच्च दर्जाची इन्फोटेनमेंट सिस्टीम याला सर्वाधिक प्राधान्य देण्यात आले असून तिची रुंदी आरामदायी अनुभवासाठी उत्तम आहे. निमुळत्या बाह्य रेषा तिला वेगळेच सौंदर्य बहाल करतात. हेडलाईटसमध्ये एलईडी तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला असून ‘ऑडी ए४’च्या नव्या आवृत्तीची ती खासियत आहे. आधीच्या मॉडेलपेक्षा या नवीन आवृत्तीत कारची डायमेंशन्स वाढवण्यात आली असली तरी वजन कमी करण्यात यश आले आहे.जवळपास १२० किलो वजन कमी करण्यात कंपनीला यश आले आहे. आधुनिक साहित्याचा आणि तंत्रज्ञानाचा वापर यामुळे या श्रेणीतील ही सर्वात कमी वजनाची कार ठरली आहे.

नवीन ‘ऑडी ए४  ३५ टीएफएसआय’ मध्ये १.४ लिटर क्षमतेचे टीएफएसआय इंजिन असून नवीन कम्बशन सिस्टीममुळे इंधन कार्यक्षमता वाढवण्यात यश आले आहे. नवीन ‘ऑडी ए ४  ३५ टीएफएसआय’ मधील अंतर्गत सजावट अत्यंत उंची आणि प्रशस्त आहे. कम्फर्ट, डायनामिक, ऑटो आणि वैयक्तिक अशा चार वेगवेगळ्या प्रकारचे ड्राईव्ह मोड सिलेक्ट करण्याची यात सुविधा आहे. त्यामुळे एकाच कारमध्ये चार कारचा अनुभव घेता येतो. सुरक्षिततेला ऑडीने नेहमीच प्रथम प्राधान्य दिले आहे. या कारमध्ये ८ एअरबॅग्ज असून पार्किंगसाठी विशेष सहायक यंत्रणा आहे. अशी माहिती कंपनीने दिली आहे.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/QZUEBG
Similar Posts
साहित्य संमेलनाचा सीएसआर उपक्रम पुणे : पुण्यामध्ये येत्या रविवारी २८ जानेवारी रोजी ‘यात्रा परिक्रमा साहित्य संमेलन’ आयोजित करण्यात आले आहे. साहसी अध्यात्मिक यात्रा परिक्रमा आणि त्यातून निर्माण झालेले साहित्य, त्यांची विक्रमी विक्री यातून सुरू झालेले विविध सामाजिक, सांस्कृतिक, पर्यावरण विषयक, लोकजीवन आणि ग्रामीण शहरी जीवनशैलीचा समन्वय
‘संशोधनात महिलांचा सहभाग वाढावा’ पुणे : ‘संशोधन क्षेत्रात पुरुषांच्या तुलनेत महिलांचे प्रमाण अतिशय कमी आहे. यामुळे आता होणारे संशोधन हे शास्त्रीयदृष्टया योग्य असले, तरी ते एकांगी पद्धतीचे आहे. विविध प्रकारच्या संशोधनांमध्ये महिलांचा सहभाग वाढला तर संशोधनाचे स्वरूप बदलेल,’ असे मत जीवशास्त्र विषयातील ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च’च्या (आयसर) शास्त्रज्ञ डॉ
‘शिखर फाऊंडेशन’ कडून स्टोक-कांगरी शिखर सर पुणे : सह्याद्रीच्या डोंगर रांगेतील हरिश्चंद्रगडचा कोकण कडा, नागफणी, नानाचा अंगठा, मोरोशीचा भैरावगड, माहुलीचा बाण, नवरा-नवरी अशा अनेक सुळक्यांवर यशस्वी चढाया करणाऱ्या तसेच नाशिक त्रिंबकेश्वर पासून ते आंबोली पर्यंतच्या साह्यवाटा आणि गडकिल्ल्यांच्या यशस्वी मोहीमा राबवून तरुण पिढीला  गिर्यारोहण क्षेत्रामध्ये
माधव गडकरी यांच्यावरील संकेतस्थळाचे उद्घाटन पुणे : ज्येष्ठ पत्रकार, साहित्यिक माधव गडकरी यांच्याविषयी समग्र माहिती देणारे, www.madhavgadkari.com हे संकेतस्थळ तयार करण्यात आले असून, नुकतेच या संकेतस्थळाचे उद्घाटन कुंदाताई गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language